नांदेड, दि. 6 ऑक्टोबर – नांदेड जिल्ह्यातील 16 पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी राखीव प्रवर्ग निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
राज्य शासनाने पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव जागांची संख्या निश्चित केली आहे.
राखीव प्रवर्गानुसार जागांचे वाटप पुढीलप्रमाणे आहे –
- अनुसूचित जाती : 2 जागा
- अनुसूचित जाती (महिला) : 1 जागा
- अनुसूचित जमाती : 1 जागा
- अनुसूचित जमाती (महिला) : 1 जागा
- नागरिकांचा मागास प्रवर्ग : 2 जागा
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : 2 जागा
- सर्वसाधारण : 3 जागा
- सर्वसाधारण (महिला) : 4 जागा
एकूण 16 पंचायत समित्यांसाठी या सोडतीनुसार सभापती पदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यावेळी निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












