नांदेड, दि. २९ ऑक्टोबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून चोरटी विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ₹80 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड तसेच मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर चार्ज नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा नांदेड) व सहा. पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पो उपनिरीक्षक तुकडे, माधव केंद्रे, करले, दारसिंग राठोड, पोलीस कर्मचारी देविदास चव्हाण, मिलिंद वाघ, लोसलवार, मनोज राठोड, माने, दासरे, गायकवाड, लहू चाटे, पिंगळवाड, डोंगरे, मदर शेख, उमर शेख, कलंदर, मोतीराम पवार, कदम, घोगरे, जाधव, चालक लोणे आणि देवकते यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
जप्त केलेला मुद्देमाल:
- ११ इंजिन
- ९२ तराफे
- ३ रास शेती
एकूण किंमत — ₹80,50,000
आरोपींची नावे
- देवेंद्र रघुवीर राम (वय 40, रा. सहापदी, जि. बलिमा, उत्तर प्रदेश)
- गुडू लाल बचन (वय 25, रा. बलिबाग, जि. रमसम, उत्तर प्रदेश)
- साकीर शेख विटा बरकत शेख (वय 38, रा. दक्षिण तमापुरा, जि. साहेबगंज, बिहार) असे एकूण आरोपी 10 आहेत
हे सर्व आरोपी बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांहून नांदेड येथे येऊन अवैधरित्या रेती उपसा करून चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली कलहाळ, भगिनी पिंपळगाव, वाहेगाव मार्कंड या परिसरात गस्तीवर असताना गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. छाप्यात गोदावरी नदी घाटावर इंजिन व तराफ्यांच्या साह्याने चालू असलेला अवैध वाळू उपसा उघड झाला.
या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा, इंजिन आणि तराफे जप्त करण्यात आले. आरोपींनी शासनाच्या महसूलाला चुकवून हा अवैध व्यवसाय केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून अशा अवैध धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.
“ऑपरेशन फ्लॅश आऊट” अंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध हाती घेतलेल्या मोहिमेत मोठा यश मिळवले असून ₹80 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्ह्यातील अवैध रेती उपसा रोखण्यासाठी एक मोठा टप्पा मानला जात आहे.












