सविस्तर बातमी:
हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर अनेकांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. अशा आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हिंगोली जिल्ह्यातील एकूण २२ व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु.१०,००,०००/- (दहा लाख रुपये) प्रमाणे एकूण रु.२,२०,००,०००/- (रुपये दोन कोटी वीस लाख) इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत देण्यात येत असून, यामुळे संबंधित कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे. या यादीत हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, सेनगाव, आकोला, नांदगाव, माळवटा अशा तालुक्यातील २२ व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार मदत मिळालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
जानेश्वर राजाराम कदम, चंद्रकांत अनवदास पाटील, विलास श्रीराम वामन, निवृत्ती नामदेव सावळकर, पांडुरंग गायकवाड मखडूब, गवाळे शिवाजी राघोजी, अनुज तुकाराम माचाखोड, प्रविण देवाजी कल्याणकर, गजानन पुरषोत्तम इंगळे, गजानन शंकरराव सिव्हे, एकनाथ भगवान चव्हाण, नागनाथ माधवराव कदम, संतोष पांडुरंग दुर्ग, माणिक सहाद्राव पंडगाव, राजकुमार पंडीताराव कानोजे, साईनाथ सहाद्राव पाडळे, गवाळे जनार्दन खजाई, जानेश्वर प्रतापराव ढवळी, काशिनाथ गणपत मगर आदी.
सरकारच्या या निर्णयामुळे कुटुंबियांना आर्थिक आधार मिळून त्यांच्या जगण्याला हातभार लागणार आहे.











