नांदेड, दि. 17 सप्टेंबर :- जिल्ह्यात बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड बाबानगर नांदेड संपर्क क्र. 02462-251674 योगेश यडपलवार 9860725448 ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.









