नांदेड – गोरठा (ता. उमरी) शिवारातील शेतामध्ये झालेल्या दुहेरी खुनाच्या गंभीर प्रकरणात नांदेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर कोर्ट ने शिक्षा ठोठावली असून मुख्य आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी आणि दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
घटनेचा तपशील
दिनांक 07 जून 2019 रोजी सकाळी 10 वाजता गोरेगाव शिवारात तीन व्यक्तींवर भांडणातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेत शंकर दिघावकर भवरक यांचा मृत्यू झाला, तर सो. शांताबाई दिघावकर या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
सदर गुन्हा क्र. 74/2019 कलम 302, 307, 34 सह कलम 25 (4) भा.का.प्रमाणे नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास मा. श्री सुरेश हसन, सहाय्यक पोलिस अधीक्षक, विभाग धर्माबाद यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर हा खटला मा. न्यायालयात दाखल करण्यात आला.
या खटल्यातील मुख्य आरोपी बबन दिघावकर भवरक (रा. गोरेगाव, उमरी) याला मा. न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व दंड, अशी शिक्षा सुनावली. तसेच इतर आरोपी –
- शंकर दिघावकर,
- माणिकराव बालाजी सावंत,
- तुळशीराव सावंत,
- गुणाजी सावंत,
यांना 4 वर्षे सक्तमजुरी व 2500/- रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांचे मार्गदर्शन
या प्रकरणी पोलिस अधीक्षक मा. श्री अबिनाश कुमार यांनी विशेष लक्ष ठेवून तपास जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण तपास करून आरोपींविरुद्ध मजबूत पुरावे सादर करण्यात आले.
न्यायालयीन निर्णय
श्री. मा. न्यायाधीश (भोकर) मोहम्मद नासिर मो सलीम सरकारी वकील अनुराधा रेड्डी (डावकर) यांनी सरकारची बाजू मांडली व सर्व पुरावे सिद्ध झाल्यास चार आरोपी ना श्री मा. न्यायाधीश मोहम्मद नसीर मोहम्मद सलीम यांनी शिक्षा सुनावली व पाच हजार रुपये दंड देण्यात आला
अभिनंदन
पोलिस अधीक्षक मा. श्री अबिनाश कुमार यांनी उमरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व तपास पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
👉 या न्यायालयीन निर्णयामुळे नांदेड पोलिसांनी दुहेरी खून प्रकरणात न्याय मिळवून दिला असून परिसरात कायद्याविषयीचा विश्वास दृढ झाला आहे.












