नांदेड (२७ सप्टेंबर) : शहरातील पोलिसांनी बेकायदेशीररित्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा करून विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत “MADE IN PAKISTAN” असा मजकूर असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत ३०,६८० रुपये इतकी आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद शुभम नगर येथील इफ्तेखार खान (वय ३२) हा इसम परवानगीशिवाय परदेशी तयार केलेले सौंदर्य प्रसाधन बेकायदेशीर मार्गाने विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता इफ्तेखार खान याच्या दुकानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात “MADE IN PAKISTAN” असे लिहिलेल्या विविध सौंदर्य प्रसाधनांचा साठा आढळून आला.
या कारवाईत ३०,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित इसमाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०४/२५ सह कलम ३१८(२) BNS, १८(सी) औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव मा श्री प्रशांत शिंदे उपविभागीय अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रंजीत भोईटे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इतरा नांदेड श्री संजय शिंदे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इतवारा नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपरीक्षक रमेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल बंडू कलंदर धीरज कुमार कोमलवार लक्ष्मण दासरवार अफजल पठाण बबन बेडदे पोलीस कॉन्स्टेबल रेवननाथ कुरनोळे हरप्रीत सिंग सुकई काकासाहेब जगताप शेख जावेद शेख इसराइल मारुती गीते सर्व पोलिस पथकाने सहभाग घेतला.
या कारवाईमुळे बेकायदेशीर व परदेशी उत्पादने विकणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून पुढील तपास सुरू आहे.












