लोहा तालुका │ अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी किर्होडा सिंचन तलाव परिसरालाही भेट देऊन पाणी साठ्याची माहिती घेतली. तलावाची सुरक्षितता व संभाव्य धोके लक्षात घेऊन आवश्यक खबरदारीचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना त्वरित मदत मिळावी आणि सुरक्षेची कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.












