मुंबई – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या (DMER) अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय शिक्षण व आयुष्य महाराष्ट्र राज्य महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर सुरू होत्या.
जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे २५ सप्टेंबर २०२५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
याबाबत सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाने कळवले आहे.











