नांदेड २८ सप्टेंबर:- (प्रतिनिधी)
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती हळूहळू आटोक्यात येत असल्याची आनंददायी बातमी आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव व मदत कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्याने अनेक गावांतील नागरिक सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले आहे.
👉 महत्त्वाची सकारात्मक घडामोडी :
- पावसाचा जोर आटोक्यात – सरासरी पर्जन्यमान घटले असून नदी-नाले ओसंडण्याचा धोका कमी झाला आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये NDRF व स्थानिक प्रशासनाने ४ बोटींच्या साहाय्याने ५० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
- रेड्डी गार्डन गजानन महाराज मंदिर जवळ ८९ नागरिक, नंदगिरी निवारा केंद्र ३५ नागरिक, गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा ४५, नागरिक मार्कंडेय मंदिर ,६० नागरिकलिबर्टी फंक्शन हॉल ३५ नागरिक पाकीजा फंक्शन हॉल ४० नागरिक, एकूण स्थलांतर केलेली नागरिकांची संख्या (३०४) सुरक्षित करण्यात आलेली आहे
- नांदेड शहरासह प्रभावित गावांमध्ये १५ पेक्षा जास्त निवारा केंद्रे उभारण्यात आला आहे
- हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत पावसाचा जोर कमी राहील अशी शक्यता आहे.
- जिल्ह्यातील मुख्य रस्ते व पूलावरील पाणी ओसरत असून वाहतूक हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
- प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था समन्वयाने काम करत असल्याने परिस्थितीवर योग्य नियंत्रण मिळवले गेले आहे.
👉 प्रशासनाचा विश्वास : (जिल्हाधिकारी राहुल कर्डिले)
जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात असून कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. आवश्यक त्या सर्व उपाययोजना जलद गतीने केल्या जात आहेत.
ही सकारात्मक बातमी नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरत असून लवकरच नांदेड जिल्हा पूर्णपणे पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












