नांदेड दि. 22 सप्टेंबर : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या गरबा व दांडिया कार्यक्रमांच्या आयोजनासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना :
- सर्व दुर्गामंडळे तसेच दांडिया, गरबा आयोजकांनी कार्यक्रम स्थळी CCTV कॅमेरे बसविणे बंधनकारक.
- अल्पवयीन मुले-मुलींना पालकांच्या सोबतीनेच प्रवेश देण्यात यावा.
- तिकीट काउंटर व प्रवेशमार्ग परिसरात योग्य सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत.
- तिकीट विक्रीत फसवणूक टाळण्यासाठी पारदर्शकता ठेवावी.
- आयोजकांनी डीजेचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करावे.
- कार्यक्रमात लेझर बीमचा वापर पूर्णतः बंदीस्त राहील.
- मध्यरात्रीनंतर कोणीही सहभागी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी.
- गरबा/दांडिया कार्यक्रमांसाठी पोलिसांनी घालून दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे.
- कार्यक्रम स्थळी आपत्कालीन क्रमांक स्पष्टपणे लावण्यात यावेत.
- कार्यक्रमस्थळी पार्किंगची योग्य व्यवस्था करणे आवश्यक.
पोलिसांचा विशेष इशारा :
कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग सहन केला जाणार नाही. आयोजकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिला आहे.
👉 नवरात्र उत्सव आनंदाने व शांततेत साजरा व्हावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून सर्व आयोजक आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












