नांदेड, दि. २९ सप्टेंबर :
मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या “नांदेड सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” पथकाने शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली. या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरडा करून शांततेचा भंग करणाऱ्या अनेक इसमांवर कारवाई करण्यात आली.
👉 भाग्यनगर पोलीस स्टेशन क्षेत्र
छत्रपती चौक व त्यांना रोड येथे दोन इसम दारू प्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असल्याने त्यांच्यावर कलम 110, 117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच हद्दीतील वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
👉 शिवाजीनगर पोलीस स्टेशन क्षेत्र
साठे चौक येथे दोन इसमांना दारू प्राशन करून गोंधळ घालताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातील दारू दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
👉 इतवारा पोलीस स्टेशन क्षेत्र
जुना मोंढा येथे एका इसमाला सार्वजनिक ठिकाणी दारू प्राशन करून आरडाओरडा करताना पकडण्यात आले. त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
👉 दामिनी पथक कारवाई
पेट्रोलिंग दरम्यान बाबानगर येथे एक इसम मोठा गोंधळ घालताना आढळून आला. त्याच्यावरही कलम 110, 117 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
🚨 या मोहिमेदरम्यान सर्व संबंधित पथकांनी आपल्या हद्दीतील दारू दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणी करून अवैध कृत्यांवर लक्ष ठेवले.
मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की –
🔴 सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये
🔴 शांततेचा भंग करू नये
🔴 दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये
अन्यथा संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.












