नांदेड, दि. 27 सप्टेंबर (प्रतिनिधी) –
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक तसेच विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या मोहिमेमुळे सार्वजनिक शिस्तभंग रोखण्यात यश मिळाले आहे.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर व उपविभागीय अधिकारी व स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली 26 सप्टेंबर 2025 रोजी ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणारे इसम सापडले. त्यांच्यावर 110/117 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
१) पोलीस स्टेशन भाग्यनगर
सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत भाग्यनगर पोलिसांनी छत्रपती चौक, येथे दोन इसमांना दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करताना पकडले. संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली असून हॉटेल, ढाबे, वाईन शॉप यांची तपासणी देखील करण्यात आली.
२) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण
एमआयडीसी परिसरात तीन इसम दारू पिऊन गोंधळ घालताना पोलिसांना सापडले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळीही हॉटेल, वाईन शॉप्सची पाहणी करण्यात आली.
३) पोलीस स्टेशन विमानतळ
रात्रभर गस्तीदरम्यान नाईक चौक व आनंद नगर परिसरात सहा इसमांना दारूच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग करताना आढळले. सर्वांवर कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले.
४) पोलीस स्टेशन वजिराबाद
वजिराबाद चौकात दोन इसम दारूच्या नशेत आढळले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. तसेच या ठिकाणी असलेल्या दारूच्या दुकानांवर व हॉटेल्स वरही तपासणी करण्यात आली.
५) दामिनी पथक
दामिनी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान विष्णुगिरी गार्डन, वर्की चौक, आझाद चौक येथे तब्बल पाच इसमांना दारू पिऊन गोंधळ घालताना पकडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांचा इशारा
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले की, नांदेड शहरात कोणालाही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा प्रकारे शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच दारू विक्रेत्यांनीही कायद्याचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
👉 या मोहिमेमुळे नांदेड शहरात कायद्याचे पालन व सार्वजनिक शिस्त टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे.












