नांदेड, दि. २८ सप्टेंबर :
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना असलेल्या संकट काळात नांदेड ग्रामीण पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी पुढाकार घेत मोठे उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी आपले एक महिन्याचे संपूर्ण वेतन पुरग्रस्तांच्या मदत निधीसाठी देणगी म्हणून जमा केले आहे.
अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील विविध भागात नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक गावे जलमय झाली आहेत. या परिस्थितीत प्रशासनासोबत अनेक सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटना मदतीसाठी धावून येत आहेत. यामध्ये पोलिस यंत्रणाही बचाव, मदत व पुनर्वसन कार्यात आघाडीवर आहे.
याच पार्श्वभूमीवर, नांदेड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवून स्वतःचे महिन्याचे वेतन मदत निधीत अर्पण केले. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
पूरग्रस्तांसाठी दाखवलेली त्यांची ही संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी इतरांना देखील प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. 🙏












