नांदेड २८ सप्टेंबर:-(प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला असून रातोळी परिसरातील मन्याड नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक पूर्ण पणे धोकादायक ठरली आहे. पुलावरून पाणी गेल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने कोणीही या पुलावरून प्रवास करू नये, असा इशारा दिला आहे.
सध्या नदीला प्रचंड पूर आला असून परिसरातील गावांमध्ये प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे. स्थानिक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी तैनात असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामस्थांनाही सतर्क राहून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व आपल्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
👉 महत्त्वाची सूचना : रातोळी-मन्याड नदीचा पूल पाण्याखाली असल्याने नागरिकांनी तातडीने पर्यायी मार्गाचा वापर करावा.












