नांदेड – शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर नांदेड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी रूट सेफ्टी पथकाने शहरातील विविध ठिकाणी गस्त घालून १० सप्टेंबर २०२५ रोजी ही मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण ६८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून दारू दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स यांची तपासणी करण्यात आली आहे.
नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशन
सिटी रूट सेफ्टी ड्राईव्हदरम्यान येथील दुग्ध डेअरी परिसरात दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या ३ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कलम ११०/११७ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले.
भाग्यनगर पोलिस स्टेशन
सकटेर वाईन शॉप, तरोडा नाका परिसरात दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या २ इसमांवर गुन्हे दाखल.
इटवारा पोलिस स्टेशन
जुना मोंढा परिसरात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या ३ इसमांवर कायदेशीर कारवाई, तसेच येथील दारू दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स तपासणी करण्यात आली.
वजिराबाद पोलिस स्टेशन
येथील पेट्रोल पंप परिसरात दारू पिऊन व विक्री करणाऱ्या १ इसमावर गुन्हा दाखल.
पोलिस अधीक्षक श्री. आबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, जेणेकरून अशा गुन्ह्यांवर वेळीच कारवाई करता येईल.











