aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Aawaz Times by Aawaz Times
January 22, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
298
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड : २२ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरात 24 व 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या VVIP दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (भा.पो.से.) यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.

या कालावधीत सकाळी 06.00 ते रात्री 22.00 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख चौक, पूल, अंडरब्रिज व महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक पूर्णतः किंवा टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे. VVIP ताफ्याच्या हालचालीदरम्यान काही मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.

वाहतूक पूर्णतः बंद असणारे प्रमुख मार्ग

  • असना ब्रिज – शंकरराव चव्हाण चौक – गुरुद्वारा – मालेगाव रोड – मालेगाव अंडर ब्रिज
  • नमस्कार चौक ते नाईक चौक – अण्णाभाऊ साठे पूल – हिंगोली गेट अंडर ब्रिज
  • आर.टी.आय. चौक ते अण्णाभाऊ साठे पूल
  • अण्णाभाऊ साठे पूल ते नाईक चौक (आनंदनगरकडे जाणारा मार्ग)
  • हिंगोली गेट अंडर ब्रिज ते अण्णाभाऊ साठे पूल
  • चिखलवाडी ते हिंगोली गेट अंडर ब्रिज
  • चिखलवाडी ते गुरुद्वारा – भवानीसिंग चौक
  • बसवेश्वर चौक ते जुना मोंढा मार्ग – वजीराबाद
  • कविता हॉटेल ते जुना मोंढा कोठ्याकडे जाणारा मार्ग

पर्यायी वाहतूक मार्ग

वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे—

  • चिखलवाडी ते अण्णाभाऊ साठे पूल मार्गे नाईक चौककडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – कोटाचे पाठीमागून हिंगोली गेट अंडर ब्रिजमार्गे वळवण्यात येईल.
  • अण्णाभाऊ साठे पूल मार्गे जाणारी वाहतूक हि. महादेव दाल मिल रोड नं. 26 कडे वळवली जाईल.
  • शिवाजी महाराज पुतळा – रेल्वे स्टेशन – हिंगोली गेट कडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध राहतील.
  • बसवेश्वर चौक ते लातूर फाटा तसेच लिंबगाव ते वाडी रोड–हसापुर मार्गे वाहतूक सुरळीत ठेवण्यात येईल.

नागरिकांना आवाहन

वाहनचालकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा अवलंब करावा व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

VVIP दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी संयम राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई

Next Post

ऐतिहासिक ‘हिंद की चादर’ समागमाच्या सुरक्षेची धुरा डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post

ऐतिहासिक ‘हिंद की चादर’ समागमाच्या सुरक्षेची धुरा डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved