aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
July 11, 2026
in क्राईम
0
अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड ११ जुलै ( प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, पोलीस अधीक्षक मा. श्री डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत मुखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडाकेबाज कारवाया करत अवैध गुटखा विक्री आणि विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या तस्करांना दणका दिला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांमार्फत एकूण ३५,५९,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१) बेरळी फाटा येथे गुटखा जप्त; एक आरोपी अटकेत
दिनांक १०/०७/२०२६ रोजी मुखेड पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मौजे बेरळी फाटा, ता. मुखेड येथे प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह सदर ठिकाणी छापा टाकला असता, एक इसम अवैध गुटखा बाळगून त्याची विक्री करताना रंगेहात आढळला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १४,१००/- रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.
याप्रकरणी आरोपी संभाजी जयवंत शिंदे (वय १९ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड) याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
२) बेटमोगरा येथे ३५ लाखांच्या हायवासह अवैध रेती जप्त
दुसऱ्या एका कारवाईत, दिनांक १०/०७/२०२६ रोजी मौजे बेटमोगरा येथील पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद वाटणारा एक हायवा टिप्पर (क्र. TS-15 UE-0444) अडवला. सदर वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना चोरटी वाहतूक केली जाणारी अंदाजे ०९ ब्रास अवैध लाल रेती (किंमत ४५,०००/- रुपये) आढळून आली. पोलिसांनी ४५ हजारांची रेती आणि सुमारे ३५,००,०००/- रुपये किमतीचा भारत बेंझ हायवा टिप्पर असा एकूण ३५,४५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत आरोपी चालक अजित पंढरीनाथ पाटील (वय ३५ वर्षे, रा. पिंपळगाव, ता. देगलूर) याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१४/२०२६, कलम ३०३(२) BNS सह जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली धडक कामगिरी: सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, पोउपनि गणेश माने, पोउपनि अभिजित तुतुरवाड तसेच पोलीस अंमलदार यादव इबितवार (पो.कॉ/४०१), शंकर बेलाडे (पो.कॉ/११०५), वीरभद्र पाटील (पो.कॉ/८७०), मन्मथ गौड (पो.कॉ/३६६) आणि अमोल सुंडगे (पो.कॉ/३२९०) यांच्या पथकाने अत्यंत चोखपणे पार पाडली.
बेकायदेशीर कृत्ये आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा: जनसंपर्क अधिकारी नांदेड जिल्हा पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी आवाहन केले आहे की, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अवैध गौण खनिज वाहतूक, साठवणूक किंवा अवैध गुटखा वाहतूक व विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल व अवैध कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

जुगार अड्ड्यावर धाड टाकून ५ लाख २ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त ७ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

नांदेड दक्षिणमध्ये निवडणूक प्रशासनाचा ॲक्शन मोड गुरुद्वारा व दरबार मस्जिद परिसरातील SIR शिबिरांना मतदारांचा उदंड प्रतिसाद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

November 3, 2026
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
Next Post
नांदेड दक्षिणमध्ये निवडणूक प्रशासनाचा ॲक्शन मोड गुरुद्वारा व दरबार मस्जिद परिसरातील SIR शिबिरांना मतदारांचा उदंड प्रतिसाद

नांदेड दक्षिणमध्ये निवडणूक प्रशासनाचा ॲक्शन मोड गुरुद्वारा व दरबार मस्जिद परिसरातील SIR शिबिरांना मतदारांचा उदंड प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved