विशेष प्रतिनिधी – माधव वाघमारे (नांदेड)
नांदेड, दिनांक ०७ नोव्हेंबर २०२६ नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्यनगर रोडवर आज दिनांक ०७/११/२०२६ रोजी पहाटेच्या सुमारास खंजिराजवळ दाखवून आणि मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका १७ वर्षीय विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या इतर दोन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी अंदाजे ५:३० वाजेच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्यनगर रोडवर तीन अज्ञात इसमांनी एका व्यक्तीस अडवून खंजिराने मारहाण केली व त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५४/२०२६ कलम ३०९(६), ३११, ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
सदर गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि/ रवी वाहुळे व त्यांचे पथक नांदेड शहरात आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित आरोपी हे बोंदार बायपासच्या बाजूला असलेल्या एका शेतात बसलेले आहेत.
माहिती मिळताच पथकाने तातडीने बोंदार बायपास ते गाडेगाव… कड जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या शेतात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तिथे बसलेले तिघे जण पळून जाऊ लागले. पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्यातील एका विधिसंघर्षित बालकास (वय १७ वर्षे, रा. माळटेकडी, नांदेड) ताब्यात घेतले, तर त्याचे इतर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
गुन्ह्याची कबुली आणि फरार साथीदार
ताबातील बालकाकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या १) प्रज्ज्वल उर्फ ऋषी वाठोरे (रा. माळटेकडी, नांदेड) आणि २) शेख गौस शेख माजीद (रा. माळटेकडी, नांदेड) या दोन फरार साथीदारांच्या मदतीने आज सकाळी चैतन्यनगर रोडवर खंजिराने मारहाण करून जबरने सोन्याची अंगठी लुटल्याची व इतर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताब्यात घेतलेल्या विधिसंघर्षित बालकास पुढील कायदेशीर कार्यवाहीस्तव भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, फरार असलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांचे उल्लेखनीय पथक
सदरची यशस्वी कामगिरी मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस निरीक्षक/ अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक/ रवि वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक/ मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक/ बळीराम दासरे, पोउपनि/ माधव केंद्रे, गुंडेराव करले, दिलीपकुर चंचलवार, देविदास चव्हाण, मोतीराम पवार, रवि बामणे, स्वामी, शेख अजहर, सिद्धार्थ सोनसळे तसेच सायबर सेल येथील राजेंद्र सिटीकर व दिपक ओढणे यांच्या पथकाने पार पाडली आहे











