मांडवी / नांदेड दिनांक २ ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मांदवी पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अशोक लिलँड पिकअप वाहना मधून गोवंशाची क्रूरपणे सुरू असलेली अवैध वाहतूक उधळून लावली असून, तब्बल ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ०९ जनावरांची सुटका केली आहे.
गोपीसकीय माहितीच्या आधारे सापळा: दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी मांदवी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, टिटवी ते मांदवी जाणाऱ्या रोडवर एका अशोक लिलँड वाहनातून गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होणार होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नमूद ठिकाणी सापळा रचला.
तपासणीत क्रूर वाहतूक उघड: संशयित अशोक लिलँड कंपनीचे पिकअप वाहन (क्रमांक एमएच-२९ बीई-६९९४) अडवून पंचमक्ष तपासणी केली असता, वाहनामध्ये जनावरांना निर्दयीपणे दोरीने घट्ट बांधून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. यात गोवंश जातीचे ०९ बैल जनावरे मिळून आली.
गुन्हा दाखल व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: पोलिसांनी पंचसमक्ष खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:
- अशोक लिलँड पिकअप वाहन: किंमत अंदाजे रु. २,५०,०००/-
- गोवंश ०९ जातीची जनावरे: किंमत अंदाजे रु. ९०,०००/-
- एकूण मुद्देमाल: ३,४०,०००/- रुपये
या प्रकरणी आरोपी १. प्रफुल बाबाराव जगताप (वय २९ वर्षे, रा. शिरोली, जि. यवतमाळ) आणि २. अनिस चांद कुरेशी (वय २९ वर्षे, रा. धानोरा, जि. आदिलाबाद) यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे मांदवी येथे गुन्हा रजि. नंबर १२२/२०२६ नुसार कलम ५ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सह कलम ११(१) प्राण्यांची क्रूरता प्रतिबंधक अधिनियम प्राण्यांना क्रूरतेने वागणूक प्रतिबंध कायदा अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्गदर्शन: सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्पणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/गायकवाड, पोउपनि/गायकवाड व पोलीस अमलदार अस्वले, माने (सर्व नेमणूक मांदवी पोलीस स्टेशन) यांनी पार पाडली.
बातमी संकलन: प्रतिनिधी: माधव वाघमारे












