aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

Aawaz Times by Aawaz Times
November 4, 2026
in Uncategorized
0
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 04  प्रतिनिधी माधव वाघमारे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आपल्या चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री सावे यांचे आभार मानले.
मंत्री अतुल सावे यांचे धाकटे चिरंजीव तथा उद्योजक अनुराग सावे यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा यांच्याशी दि. 25 नोव्हेंबर रोजी नियोजित आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या नुकसानीमुळे कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळा साजरा करणे उचित नसल्याची भूमिका दोन्ही परिवारांनी घेतली. विवाह सोहळ्यासाठी नियोजित असलेला खर्च टाळून ही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा संवेदनशील निर्णय त्यांनी घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ही एक कोटी रुपयांची देणगी समर्पित करण्यात आली आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


ShareSend
Previous Post

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Next Post

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस पथके अधिक सक्रिय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा
Uncategorized

विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस पथके अधिक सक्रिय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा

October 8, 2026
नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
Uncategorized

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा
Uncategorized

नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा

September 9, 2026
कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका
Uncategorized

कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका

September 4, 2026
देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त
Uncategorized

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त

September 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश

August 14, 2026
Next Post
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved