प्रतिनिधी: माधव वाघमारे दिनांक ४ नोव्हेंबर
नांदेड जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध तसेच शारीरिक स्वरूपाचे गुन्हे रोखणे, सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री २३.०० वाजेपासून ते ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ०३.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विशेष “कॉम्बिंग ऑपरेशन” राबवण्यात आले.
या विशेष मोहिमेदरम्यान सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे व्यक्ती, तडीपार व्यक्ती, हिस्ट्रीशीटर तसेच पाहिजे व फरारी आरोपी यांची सखोल पडताळणी करण्यात आली. संशयित व्यक्ती, गुन्हेगारांच्या हालचाली आणि त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणांची तपासणी करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधत्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:
- ५३ अधिकारी आणि २०३ अंमलदार कॉम्बिंग ऑपरेशन कामी लावण्यात आले होते.
- २७ तडीपार/प्रस्तावित गुन्हेगारांचे चेक करण्यात आले, तर ३१ एमपीडीए (MPDA) मधून सुटलेले गुन्हेगार तपासण्यात आले.
- शरीराविरुद्धचे ६४ सराईत गुन्हेगार तपासले गेले.
- ०१ पाहिजे/फरारी आरोपी अटक करण्यात आला.
- कलम १२२, मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल करण्यात आले.
- वॉरंट बजावणीमध्ये ३१ बी डब्ल्यू (BW) आणि ०५ एन बी डब्ल्यू (NBW) तसेच ४४ समन्स बजावण्यात आले.
अवैध शस्त्र व संशयित हालचालींवरील कारवाई:
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान शस्त्र बाळगणाऱ्या तसेच संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये ०७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात खालीलप्रमाणे पोलीस स्टेशननिहाय गुन्हे नोंदवले गेले आहेत:
- भाग्यनगर गुन्हे क्र. 642/2026, 643/2026 (प्रत्येकी ०१ आरोपी) आणि गुन्हे क्र. 644/2026 (०३ आरोपी).
- विमानतळ: गुन्हा क्र. 480/2026 (०१ आरोपी).
- नांदेड ग्रामीण: गुन्हा क्र. 1247/2026 (०१ आरोपी).
- शिवाजीनगर: गुन्हा क्र. 478/2026 (०१ आरोपी).
- सिंदखेड: गुन्हा क्र. 134/2026 (०२ आरोपी).
या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील सराईत व प्रतिबंधित गुन्हेгаांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत झाली असून, समन्स ४४ तर ३१ बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली असून नॉन बेलेबल वॉरंट मधील ०५ आरोपींना संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
सदर विशेष मोहिमेत मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे आदेशाने श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील अधिकारी व अंमलदार तसेच RCP पथकाने सक्रिय सहभाग घेऊन व्यापक तपासणी व कारवाई केली. नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगार, तडीपार/हद्दपार व्यक्ती, पाहिजे व फरारी आरोपी तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असून, जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल.












