aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

Aawaz Times by Aawaz Times
November 3, 2026
in क्राईम
0
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी: माधव वाघमारे दिनांक २ नोव्हेंबर

नांदेड: नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. वजिराबाद हद्दीतील लिंगायत स्मशानभूमीच्या बाजूला मोकळ्या जागेत सुरू असलेल्या ‘तिर्रट’ नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि ६ मोटरसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कशी झाली कारवाई?

दिनांक ०२/११/2026 रोजी रात्री वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक/खंडू दर्शने आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार रात्रीची गस्त घालीत होते. गस्त घाालत देवाचकाळ परिसर आला असता, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, लिंगायत स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या झाडीतील मोकळ्या जागेवर काही इसम गोलाकार बसून पैशावर ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने दिनांक ०३/११/2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सदर ठिकाणी शिताफीने छापा मारला. यावेळेस जुगार खेळणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले, तर चौकशीदरम्यान हा जुगार अड्डा चालवणाऱ्या आणखी ०४ जणांची नावे निष्पन्न झाली.

या आरोपींवर झाला गुन्हा दाखल:

जुगार खेळताना ताब्यात घेतलेले व निष्पन्न झालेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत: १) शेफ नदीम शेख अब्दुल्ला (वय ३१ वर्षे, रा. बरकतपुरा, वाघी रोड, नांदेड) २) सय्यद जुबेर सय्यद नवाबअली (वय २३ वर्षे, रा. खडकापुरा, नांदेड) ३) बिरसिंग कार्तसिंग रागी (वय ३५ वर्षे, रा. सहिदपुरा गेट क्र. ०५, नांदेड) ४) ईरुफान बेग समदाणी बेग (वय ३१ वर्षे, रा. तेहरानगर, घामोडीया फॅक्टरी, बस स्टॅंड, नांदेड) ५) मोहम्मद जमिर पि. अब्दुल रज्जाक (वय ३८ वर्षे, रा. गोवर्धनघाट टेकडी, नांदेड) ६) महमंद शाकीर पि. महमंद ताजोदद्दीन (वय ४७ वर्षे, रा. नवीन हस्सापूर, वाघी रोड, नांदेड) ७) शमशोद्दीन अमीरोद्दीन शेख (वय ४५ वर्षे, रा. मिलगेट, जेलरोड, नांदेड) ८) सय्यद मोसीन सय्यद कासीम (वय ३० वर्षे, रा. दुल्हेशाह रेहेमान नगर, वाघी रोड, नांदेड) ९) अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार (वय ३० वर्षे, रा. दुल्हेशाह रेहेमान नगर, वाघी रोड, नांदेड) १०) हरप्रितसिंग कुलवंतसिंग चहल (वय ३० वर्षे, रा. गुरुद्वारा गेट क्र. ०४, नांदेड) ११) भगतसिंग गुरुदयालसिंग ढिलो (वय ४७ वर्षे, रा. गुरुद्वारा गेट क्र. ०४, नांदेड) १२) सय्यद नसिर (रा. खडकापुरा, नांदेड) १३) सय्यद फरहान (रा. खडकापुरा, नांदेड) १४) यासीन शेख (रा. दुल्हेशाह रेहेमान नगर, वाघी रोड, नांदेड) १५) युसुफखान युनूसखान (रा. दुल्हेशाह रेहेमान नगर, वाघी रोड, नांदेड)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

पोलिसांनी दोन पंचक्यासमक्ष आरोपींची अंगझडती व घटनास्थळाचा पंचनामा करून:

  • रोख रक्कम: ३,३९०/- रुपये
  • जुगाराचे साहित्य
  • सहा मोटरसायकल (क्र. MH-46-BS-6224, क्र. MH-26-CG-4850, क्र. MH-26-AU-6113, क्र. MH-26-Y-4813, क्र. MH-26-CG-5125, क्र. MH-26-CN-6917; अंदाजे किंमत ३,५५,०००/- रुपये) असा एकूण ३,५८,३९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५४०/२०२६ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्गदर्शन व कारवाई:

सदरची कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे आदेशाने मा. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, मा. रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने व पोलीस अंमलदार बालाजी सातपुते, केंद्रे, गव्हाणकर, संतोष पोकलये, इम्रान पठान, ज्वालासिंग बावरी, सय्यद, विलास कदम, पावडे आणि शाहू यांनी केली आहे. अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकाराविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी

Next Post

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
Next Post
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved