aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड दक्षिणमध्ये निवडणूक प्रशासनाचा ॲक्शन मोड गुरुद्वारा व दरबार मस्जिद परिसरातील SIR शिबिरांना मतदारांचा उदंड प्रतिसाद

Aawaz Times by Aawaz Times
July 11, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेड दक्षिणमध्ये निवडणूक प्रशासनाचा ॲक्शन मोड गुरुद्वारा व दरबार मस्जिद परिसरातील SIR शिबिरांना मतदारांचा उदंड प्रतिसाद
0
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ११ जुलै (प्रतिनिधी, माधव वाघमारे) :– भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या ‘विशेष सखोल पुनर्निरिक्षण’ (SIR) कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविला जात आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. ११ जुलै) शहरातील ऐतिहासिक गुरुद्वारा परिसर आणि सराफा गल्ली येथील दरबार मस्जिद परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांनी आणि मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या दोन्ही महत्त्वपूर्ण ठिकाणच्या शिबिरांना मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संजय वारकड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

उपविभागीय अधिकाऱ्यांचा थेट सहभाग, गुरुद्वारात जनजागृती

गुरुद्वारा परिसरातील शिबिराला भेट दिली असता, डॉ. सचिन खल्लाळ यांनी स्वतः पुढाकार घेत काही मतदारांचे ‘इन्युमरेशन फॉर्म’ (Enumeration Form) बीएलओच्या मोबाईल ॲपद्वारे जागेवरच भरून घेतले. प्रशासकीय अधिकाऱ्याचा हा थेट सहभाग पाहून नागरिकांचा उत्साह वाढला. यावेळी डॉ. खल्लाळ यांनी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून, ‘एसआयआर’ प्रक्रियेची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

दरबार मस्जिदीत बैठक; ‘ॲनॉमली’बाबत संभ्रम दूर

यानंतर सराफा गल्लीतील प्रसिद्ध दरबार मस्जिद परिसरात महसूल व निवडणूक प्रशासनाच्या वतीने विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला इमाम साहेब, मस्जिदचे प्रतिनिधी आणि परिसरातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मतदारांच्या मनातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले. अनेक मतदारांच्या मनात ‘ॲनॉमली’ (Anomaly – मतदार यादीतील त्रुटी/विसंगती) संदर्भात मोठा संभ्रम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यावर डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी उपस्थितांना अत्यंत सोप्या भाषेत कायदेशीर तरतुदी समजावून सांगत सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

धार्मिक व सामाजिक प्रतिनिधींचे सहकार्याचे आश्वासन

या शिबिरांच्या माध्यमातून सर्व पात्र नागरिकांनी आपले ‘इन्युमरेशन फॉर्म’ वेळेत भरून देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, दरबार मस्जिदीच्या माध्यमातून आणि धार्मिक व्यासपीठावरून ‘SIR’ मोहिमेबाबत समाजात आवश्यक ती जनजागृती केली जाईल, असे आश्वासन इमाम साहेबांनी प्रशासनाला दिले.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
“नांदेड दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाने या ‘विशेष सखोल पुनर्निरिक्षण’ (SIR) प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपले फॉर्म वेळेत भरून देण्यासोबतच आपल्या परिसरातील इतर नागरिकांनाही यासाठी प्रेरित करावे, जेणेकरून एक शुद्ध आणि पारदर्शक मतदार यादी तयार होण्यास मदत होईल.”
– जिल्हा प्रशासन, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी आंतरजिल्हा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ८ गुन्हे उघडकीस आणत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post
नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी आंतरजिल्हा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ८ गुन्हे उघडकीस आणत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी आंतरजिल्हा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ८ गुन्हे उघडकीस आणत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved