नांदेड दिनांक २ नोव्हेंबर प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आईडीवर आज दिनांक ०२/११/२०२६ रोजी दुपारी एका ईमेलद्वारे न्यायालयात आयईडी (IED) बॉम्बस्फोट घडवून आणण्याबाबतची धमकी प्राप्त झाली होती. सदर ईमेल जिल्हा न्यायालयाकडून पुढील तात्काळ कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनाला प्राप्त झाला.
पोलिसांनी तत्काळ घेतलेला ताबा व सुरक्षा उपाययोजना:
- तातडीची कारवाई माहिती मिळताच अजित कुंभार (पोलीस निरीक्षक, वजीराबाद), रणजीत भोईटे (पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी शाखा – ATB) तसेच दहशतवाद विरोधी पथकाने मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक नांदेड) तात्काळ न्यायालयात धाव घेतली.
- परिसर खाली करणे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (PDJ) यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनांनुसार पीए (PA) सिस्टीमद्वारे उद्घोषण करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयातील सर्व पक्षकार, वकील, अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ न्यायालय परिसराबाहेर काढण्यात आले.
बीडीडीएस (BDDS) पथकाकडून सखोल तपासणी
- तपासणी मोहीम मिना तोटेवाड (पोलीस निरीक्षक, बॉम्बशोधक व नाशक पथक – BDDS) तसेच मारोती चव्हाण (जल्दी प्रतिसाद पथक) व त्यांच्या पथकाने संपूर्ण न्यायालय परिसराची घातपात विरोधी तपासणी केली.
- दोन तास तपासणी जिल्हा व सत्र न्यायालयाची मुख्य इमारत, आतील व बाहेरील संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. तब्बल दोन तास चाललेल्या या सखोल तपासणीदरम्यान न्यायालय परिसरात कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळून आलेली नाही, असे बीडीडीएस पथकाने स्पष्ट केले.
न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू
तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणि परिसर पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर, मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने दुपारी २:२५ वाजता न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले व पक्षकार आणि नागरिकांना न्यायालयात प्रवेश देण्यास मुभा देण्यात आली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा व ईमेल स्रोताचा तांत्रिक तपास पोलीस विभागाकडून युद्धपातळीवर केला जात आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिक, वकिलांना व पक्षकारांना मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की, कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवून नये व घाबरून जाऊ नये. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज व सतर्क आहे.












