नांदेड दि. १ ऑक्टोबर :-नांदेड शहरातील विविध भागात दिवसाढवळ्या खुला मटका व्यवसाय सुरु असून, प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जुगाराच्या या अवैध धंद्यामुळे युवक दिशाभूल होत असून अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळत आहे. शाळा–कॉलेजमध्ये शिकणारे तरुण सुद्धा या विळख्यात ओढले जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
कायद्याने बंदी असूनही नांदेड शहरात खुलेआम मटका व्यवसाय सुरु असल्याने स्थानिक लोक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पोलीसांनी नियमित गस्त घालून मटका अड्ड्यांवर छापे टाकावेत व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, सामाजिक संघटना व जागरूक नागरिकांनी जुगारामुळे होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती करण्याची मोहिम हाती घेतली असून तरुणाईला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
👉 प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.












