नांदेड (दि. 30 ऑक्टोबर 2025) ( प्रतिनिधी) माधव वाघमारे पोलिसांच्या सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर मोठी धडक कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड शहर तसेच प्रमुख यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी 29 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड शहरातील विविध ठिकाणी सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.
🔹 १) पोलिस स्टेशन भाग्यनगर क्षेत्रात कारवाई
महिला पोलीस अधिकारी अमंदिप कौर यांच्या पथकाने शिवनगर, अशोक नगर, परिसरात अचानक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे आढळले असून त्यांच्यावर कलम 110/117 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तसेच संशयित ठिकाणी दुकाने, वाईन शॉप्स आणि हॉटेल्स यांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान अवैध दारू विक्रीसंबंधीही चौकशी करण्यात आली.
🔹 २) पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण क्षेत्रात कारवाई
अमंदिप कौर यांच्या पथकाने ढवळे कॉर्नर परिसरात कारवाई केली. या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणारे आढळले. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून परिसरातील दारू दुकाने व हॉटेल्स तपासण्यात आले.
🔹 ३) पोलिस स्टेशन शिवाजीनगर क्षेत्रात कारवाई
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कविता स्टेशनरी शेजारील परिसरात तपासणी करण्यात आली. येथे देखील सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणारे आढळल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी हॉटेल्स, दारू दुकाने, वाईन शॉप्स तपासण्यात आली.
मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की.
“सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”












