नांदेड (प्रतिनिधी): नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत गावठी पिस्तूलसह एकास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव व पोलीस उपअधीक्षक (स्थानीय गुन्हे शाखा) मा. उदय खंडेराय यांच्या देखरेखी खाली ही कारवाई करण्यात आली.
आरोपीचे नाव व तपशील
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हर्षित देविदास शर्मा (वय २५ वर्षे, व्यवसाय बेकार, रा. गोवर्धन घाट, वजिराबाद नांदेड असे आहे. आरोपीकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण ३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचे तपशील
स्थानीय गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोवर्धन घाट परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी संशयास्पद रित्या फिरताना दिसून आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस मिळून आले.
या प्रकरणी बारशीताकळी पोलीस ठाण्यात कलम ३/२५, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री. मिलिंद सोनवणे, पोलीस हवालदार बामणे, पोलीस नाईक शेळके, पोलीस/शिपाई, यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहभागी झाले होते.












