धर्माबाद (ता. नांदेड) – दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 02.55 ते 03.04 वाजेच्या दरम्यान, फिर्यादी सागर वार अँड रेस्टॉरंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी जबरीने प्रवेश करून काउंटरमधील रोकड रक्कम 55,820 रुपये लंपास केली. या प्रकरणी फिर्यादी माधव लक्ष्मण बबनवार, वय 45 वर्ष, रा. धर्माबाद यांनी तक्रार दिली असून, धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 268/2025, कलम 334(1), 305(3), 3(5) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यनगरमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू – प्रियकरावर गुन्हा दाखल
भाग्यनगर (ता. नांदेड) – दि. 09 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पूर्वजवळ बॉईज हॉस्टेल काश्मीरगंज, नांदेड येथे पवन बिदलिंग चव्हाण याने आपल्या विवाहित प्रेयसीसोबत वाद घालून तिला मारहाण केली. मारहाणीमुळे पीडितेची प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी धर्मसिंह पडकव, वय 17 वर्ष यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 494/2025 कलम 118(2), 352, 3(5) भा.दं.वि. अन्वये तक्रार दिली आहे.
विश्वासघात करून फसवणूक – 26 लाखांचा गंडा
इटवारा (ता. नांदेड) – दि. 03 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता, आरोपी हुसैन मलिक, छत्र मलिक यांनी पीडित शेख लतीफ शेख अहमद अली, वय 53 वर्ष, यांच्याकडून पश्चिम बंगाल येथे हज यात्रा घडवून आणण्याचे खोटे आश्वासन देऊन एकूण 26,48,700 रुपये फसवणूक करून घेतले. याप्रकरणी इटवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 286/2025 कलम 316(2), 318(4) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल आहे.
शिवाजी नगरात मारहाणीची खंडणी – 2.5 लाखांची मागणी
शिवाजीनगर (ता. नांदेड) – दि. 24 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजता आरोपी निहाल, सोहेल, इमरान व पुन्हा दोन साथीदारांनी फिर्यादी तौफिक इस्माईल शेख, वय 47 वर्ष यांना मारहाण करून 1,50,000 रुपये रोख आणि आणखी 2,50,000 रुपये खंडणीची मागणी केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 340/2025 कलम 208(2), 308(3), 333, 115(2), 352, 3(5) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल आहे.
मांडवीत दारूच्या अवैध विक्रीवर छापा – 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
मांडवी (ता. किंदवट, जि. नांदेड) – दि. 09 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 वाजता पोलीसांनी गोरखवाड येथे छापा टाकून आरोपी गोरखबाई मडसू यांनी अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेली देशी दारू जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत 10,000 रुपये असून, गुन्हा क्र. 83/2025 कलम 65(ई) म.प्र.का. कायदा अन्वये मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हिमायतनगरात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
हिमायतनगर (ता. नांदेड) – दि. 09 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता, आंधगाव येथील शेतकरी लक्ष्मण पोळन्ना पालसजवाड, वय 45 वर्ष यांनी शेतातील पीक बुडाल्याने व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (गुन्हा क्र. 22/2025 कलम 194 भा.दं.वि.) करण्यात आली आहे.












