नांदेड :
शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत बनावट नोटा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तब्बल ₹1,73,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री उशिरा नांदेड येथील एम. एफ. हॉटेल शेजारील भागात करण्यात आली.
प्रकरणाचा उलगडा
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक मोहम्मद साजिद हुसेन यांनी पोलीस हकॉन्स्टेबल पद्मसिंह काळे अनिल झांबरे उमेश ओकासकर बालाजी यादगिरवाड लिंबाजी राठोड अंकुश लंगोटे संजय यमलवाड व सायबर सेल पो कॉन्स्टेबल राजू सिटीकर दीपक ओढणे पथकासह छापा टाकला. या कारवाईत बनावट चलनी नोटा तयार करून वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
अटक आरोपी
- महेश कृष्णाजी सुतारे वय 31 वर्षे, व्यवसाय व्यापारी, रा. माणगपूरा, नांदेड
- सोनूसिंघ पि मुखतयार सिंग वय 28 वर्षे, रा. गुरुद्वारा सौदागर नगीना घाट नांदेड,
- मसू पांडुरंग शेंडगे, वय 50 वर्षे, रा. सिडको महामार्ग, छत्रपती संभाजीनगर
जप्त मुद्देमाल
- आरोपी महेश तुतारे याच्याकडून ₹36,500/- किंमतीच्या 500 रुपयांच्या 73 बनावट नोटा
- आरोपी सोमनाथ चहल याच्याकडून ₹97,000/- किंमतीच्या 500 रुपयांच्या 194 बनावट नोटा
- आरोपी मसूद शेंडगे याच्याकडून स्कुटी (MH-26-BB-0674) किंमत ₹40,000/-
👉 एकूण मुद्देमाल : ₹1,73,500/-
पुढील तपास
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबीनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
➡️ शिवाजीनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे बनावट नोटा व्यवहारातील मोठे षड्यंत्र उघड झाले असून नांदेड पोलिसांची ही मोठी कामगिरी ठरली आहे.












