नांदेड दि. 23 सप्टेंबर :- जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांनी अधिकृत https://mhhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनाचे काम जसे वाहन हस्तांतरण, वाहनाची पुन: नोंदणी, वाहनाचे वित्तदात्यांची नोंदणी, वाहनाची वित्तदात्याचा बोजा उतरवणे इत्यादी होऊ शकणार नाही. मोटार वाहन कायद्यानुसार सदर नंबर प्लेट मुदतीत बसून वाहनाचे कामकाज करावे व दंड टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनाला HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हायसिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना HSRP बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची उत्पादकाची निवड करण्यात आली आहे.
वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. इतर कुठल्याही संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रक्टरकरिता 450 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये, सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745 रुपये इतका दर आकारला जाणार असून याव्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे. सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे. या दरांव्यतिरीक्त फिटमेंट सेंटरकडुन एचएसआरपी HSRP बसविण्याकरिता जादा पैशाची मागणी करत असेल तर या कार्यालयास त्याबाबत तक्रार दाखल करता येईल.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्यासाठी Appointment घेण्याची कार्यपद्धती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
सद्य:स्थितीत नांदेड जिल्ह्यात 19 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत एकुण 1 लाख 21 हजार 728 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने HSRP नंबर प्लेट बसविण्याकरिता करण्यात आली असून 73 हजार 406 इतक्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यात आलेली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता प्रतिसाद वाढत असून वाहन धारकांनी वेळेत वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी. तसेच वाहनांना HSRP बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.












