नांदेड (२४ सप्टेंबर) : शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे, शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक मा. श्री. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलिस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव व सा.पोलिस निरीक्षक क मा. श्री. भगवात नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सिटी स्ट्राईक सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत विशेष मोहिम राबवण्यात आली.
दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी शहरातील विविध भागांमध्ये चालवलेल्या मोहिमेदरम्यान एकूण सात इसमांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भागनुर पोलिस ठाण्याचा हद्दीतील कारवाई
पोलिस अंमलदार यांनी शंकरराव चौक, वर्कशॉप येथे ३ इसमांवर दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कारवाई केली. तसेच हॉटेल्स, दारू दुकाने, वाईन शॉप्स यांची तपासणीही करण्यात आली.
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचा हद्दीतील कारवाई
एम. आय. टी. सी परिसरात १ इसम दारूच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग करताना आढळून आला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा हद्दीतील कारवाई
नवीन मोंढा भागात २ इसम दारू पिऊन शांतता भंग करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्यावर तत्काळ गुन्हे नोंदवले.
इटकुर पोलिस ठाण्याचा हद्दीतील कारवाई
जुना मोंढा भागात १ इसम दारूच्या नशेत सापडला. त्याच्यावरही कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दानीनी पथकाची कारवाई
पेट्रोलिंग दरम्यान जुन्या मोंढा भागात १ इसम आढळून आला. त्याने सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षकांचा इशारा
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबीनाश कुमार यांनी स्पष्ट केले की, नांदेड शहरात कुठलाही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याची किंवा दारू पिऊन गोंधळ घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा कृत्यांमुळे शांतता भंग होत असल्याने यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
👉 वाचकांसाठी : नांदेडकरांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.












