नांदेड, दि. 09 सप्टेंबर 2025
नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे प्राप्त माहितीनुसार, दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10:37 वाजता नांदेड शहरातील विमातळा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्र. 349/2025 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 296, 353 (2), 351 (A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार भवन दिनांतर खरात रा. प्रोफेसर कॉलनी, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी महिला भारतीताई पवार रा. तरोडा (बु.) यांनी मोबाईलवरून अपमानास्पद, असभ्य व शिवीगाळ करणारे संदेश पाठवून तक्रारदारास त्रास दिला तसेच सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
नांदेड जिल्हा पोलिस दलाने सर्व जनतेस आवाहन केले आहे की, कोणतीही व्यक्ती समाज माध्यमावर भडकावू संदेश प्रसारित करू नये, अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. जर कोणी अशा प्रकारे समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.












