नांदेड, दि. 24 नोव्हेंबर :-(प्रतिनिधी) माधव वाघमारे छत्रपती संभाजीनगर येथील मा. राज्य माहिती आयोग खंडपीठाने विविध प्राधिकरणांकडे मोठ्या प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या अपिलार्थ्यांच्या द्वितीय अपिलांवर सुनावणी घेऊन ती फेटाळत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. संबंधित आदेश आयोगाच्या अधिकृत www.sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्तुत प्रकरणात अपिलार्थ्यांनी तब्बल 56 माहिती अर्ज विविध विभागांकडे दाखल केले होते. अत्याधिक व पुनरावृत्ती स्वरूपातील अर्जामुळे प्रशासनावर अनावश्यक ताण येत असल्याचे नमूद करत आयोगाने हे अपिले फेटाळले आहेत.
प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसिलदार (सामान्य), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विविध अपिलार्थ्यांची आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या आणि निर्णय दिनांक पुढीलप्रमाणे—
🔹 द्वितीय अपिले फेटाळलेल्या अपिलार्थ्यांची यादी :
• केशवराजे निंबाळकर – अपिले: 2,788 | निर्णय : 26 जून 2024
• केशवराजे निंबाळकर – अपिले: 842 | निर्णय : 19 डिसेंबर 2024
• शरद दाभाडे – अपिले: 159 | निर्णय : 26 एप्रिल 2024
• शरद दाभाडे – अपिले: 986 | निर्णय : 27 सप्टेंबर 2024
• मोतीराम गयबु काळे – अपिले: 463 | निर्णय : 23 सप्टेंबर 2024
• बाळासाहेब भास्कर बनसोडे – अपिले: 256 | निर्णय : 20 डिसेंबर 2024
• श्रीमती अनिता नितीन वानखेडे – अपिले: 196 | निर्णय : 6 सप्टेंबर 2024
• बाबुराव धोंडु चव्हाण – अपिले: 198 | निर्णय : 20 जानेवारी 2025
• जयभीम नरसिंगराव सोनकांबळे – अपिले: 176 | निर्णय : 1 ऑक्टोबर 2024
• हरि प्रताप गिरी – अपिले: 296 | निर्णय : 28 ऑगस्ट 2024
• विनोदकुमार भारुका – अपिले: 236 | निर्णय : 23 ऑगस्ट 2024
• गिरीश म. यादव – अपिले: 206 | निर्णय : 23 ऑगस्ट 2024
• संजय हाबु राठोड – अपिले: 100 | निर्णय : 30 ऑगस्ट 2024
• रायभान किसन उघडे – अपिले: 216 | निर्णय : 30 सप्टेंबर 2024
• बालाजी बळीराम बंडे – अपिले: 156 | निर्णय : 1 ऑक्टोबर 2024
• भालचंद्र साळुंके – अपिले: 103 | निर्णय : 24 जानेवारी 2025
• मिलिंद दगडू मकासरे – अपिले: 125 | निर्णय : 30 ऑगस्ट 2024
• ज्ञानेश्वर धायगुडे – अपिले: 86 | निर्णय : 24 जानेवारी 2025
• सुरज नंदकिशोर व्यास – अपिले: 63 | निर्णय : 24 जानेवारी 2025
• जनक रामराव गायकवाड – अपिले: 81 | निर्णय : 4 जुलै 2025
या निर्णयाने अनावश्यक व मोठ्या प्रमाणावर केवळ प्रशासनावर ताण निर्माण करणाऱ्या अर्जांची कलंबणं रोखण्याचे काम आयोगाने केले असल्याचे प्रशासनिक वर्तुळात सांगितले जात आहे. संबंधित अपिलार्थ्यांना राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अनिवार्य राहणार आहे.
प्रथम अपिलीय अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, माहिती अधिकाराचा दुरूपयोग टाळून आवश्यक त्या मर्यादित, स्पष्ट व वस्तुनिष्ठ माहितीसाठीच अर्ज दाखल करावेत, जेणेकरून प्रशासनाची कार्यक्षमता टिकून राहील.












