नांदेड, दि. 05 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्हा क्रमांक 637/2025 अंतर्गत दाखल झालेल्या 64(2),(i),(m),304(2),118(2) BNS तसेच 4,6,8 POCSO कलमानुसार फरार असलेल्या महत्त्वाच्या आरोपीला नांदेड पोलिसांनी अवघ्या तिन तासांच्या शोध नाकाबंदी नंतर ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
🔹 घटनेचा तपशील
दिनांक 04/12/2025 रोजी रात्री उशिरा 22.00 वाजता गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने सर्व नाकाबंदी सुरू केली व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा मागोवा घेतला.
🔹 पोलीस दलाची संयुक्त मोहीम
या कारवाईत खालील अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदविला—
- पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार
- अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील
- उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सूरज गुरव
- उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर श्री. रामेश्वर व्यंजने
- पोलीस निरीक्षक भाग्यनगर संतोष तांबे
त्यांच्या समन्वित कारवाईमुळे आरोपीला तात्काळ शोधणे शक्य झाले.
🔹 अटक केलेला आरोपी
अटक आरोपीचे नाव — मल्हारी उर्फ आकाश विनायक येरमुनवाड, वय 21, रा. सुनेगाव, ता. लोहा, जि. नांदेड.
तो चाकूर तालुक्यातील लाडूर परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ धाड टाकली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला वेढा घालून ताब्यात घेण्यात आले.
🔹 मोबाईल व वाहन तपासणीमुळे मिळाला ठावठिकाणा
तांत्रिक तपासात आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला असता तो नांदेड–लातूर रोड परिसरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले. MH-26 CK 5625 या वाहनातून तो प्रवास करत असल्याचे समजताच सर्व नाकाबंद्यांना इशारा देऊन शोधमोहीम तीव्र करण्यात आली.
🔹 पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला गौरव
गुन्ह्याच्या तात्काळ उकल व आरोपीस केलेल्या अटकेबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.












