aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

Aawaz Times by Aawaz Times
December 25, 2025
in क्राईम
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठे यश मिळवले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ३० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत ११ लाख ०८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किव्हट व माहूर परिसरात सापळा रचून संशयितांवर कारवाई केली. चौकशीत आरोपींनी नांदेड जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करून त्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे विक्री केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे—

  1. शेख सलमान उर्फ सल्ला शेख मेहबूब (वय २७),
  2. शेख अल्ताफ उर्फ कालू शेख अशरफ (वय १९),
  3. शेख सोहेल शेख शौकत उर्फ गांजा (वय २४),
    (सर्व रा. चिखली बु. ता. किव्हट, जि. नांदेड)

या टोळीविरुद्ध किव्हट, मुदखेड, हिमायतनगर, मांजरी, माहूर, सिंदखेड, वजीराबाद, शिवाजीनगर, बिलोली जि. यवतमाळ, अहमदपूर जि. लातूर, परभा जि. यवतमाळ आदी पोलीस ठाण्यांत कलम ३०३(२) बीएनएस व ३७९ आयपीसी अन्वये दाखल गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेल्या ३० दुचाक्यांपैकी १९ दुचाकींबाबत चोरीचे गुन्हे निष्पन्न झाले असून उर्वरित बाबत तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (स्था. गु. शा.) श्री. उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणावर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

नांदेड पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-२०२५ अंतर्गत वडवणा खडकी ग्रामपंचायतीत विकासकामांचा धडाका

Next Post

दामिनी पथकाची धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026
क्राईम

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

February 24, 2026
क्राईम

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

February 23, 2026
क्राईम

नांदेड शहरात वैशिष्ट्यपूर्ण वाहने फटाका बुलेट आणि हुलडबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई

February 20, 2026
क्राईम

जालना रेल्वे स्थानकावर आरपीएफची धाड दलालाला अटक प्रवाशांकडून घेतलेले कमिशन जप्त

February 19, 2026
क्राईम

गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

February 18, 2026
Next Post

दामिनी पथकाची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved