नांदेड दि. 8 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी फेब्रु-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE+ मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (नोंदणी प्रमाणपत्र) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्र त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदर आवेदनपत्र www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन भरावयाची आहेत. त्याचा तपशीलप्रमाणे पुढीलप्रमाणे आहे.
शुल्क प्रकार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामाफ्रत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE+ मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम एचएससी व्होकेशनल स्ट्रीम शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीनुसार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे तसेच आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट घेणारे विद्यार्थी ) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा. नियमित शुल्क सोमवार 30 सप्टेंबर 2025 पर्यत भरावयाचे आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस, एनईएफटी पावती, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईल मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्र भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाना कॉलेज लॉगीन मधून प्रि लिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयानी त्यांची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. या प्रिलीस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, प्राचार्य यांनी प्रिलीस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इयत्ता 12 वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरुन UDISE+ मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. UDISE+ मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरुन आवेदनपत्रे सादर करता येईल. पुनर्परिक्षण, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणीसुधार व तुरळक विषय घेवून परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट घेणारे विद्यार्थी ) व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्य विद्यार्थ्यांची माहिती UDISE+ मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चीत केलेल्या तारखांना ऑनलाइन पध्दतीने भरावयाची आहेत अशी माहिती पुणे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.











