aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, October 29, 2025
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, October 29, 2025
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

समाजाचा कणा बळकट करणारे उद्योजक व्हा –मा.ना. चंद्रकांत दादा पाटील

Aawaz Times by Aawaz Times
September 20, 2025
in राजकारण, शिक्षण
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड 20/09/25महाराष्ट्र शासनाकडून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा विविध योजनाद्वारे नव्या पिढीला साठी संधीची द्वारे उघडली आहेत. त्यातून नवीन प्रयोग, नवीन वाटचाली घडविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. उद्योजकतेला आणि करिअरला मूल्यांची आणि समाजसेवेची जोड द्या. तुमच्या प्रत्येक कृतीत प्रमाणिकपणा, जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दलची आस्था असावी, असा मूलमंत्र महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभास उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर संपन्न झालेल्या या समारोहाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे होते. त्यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका विद्यापीठ उज्जैनचे कुलपती तथा आय.आय.टी., कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय गोविंद धांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. संगीता माकोने, डॉ. संतराम मुंढे, नरेंद्र चव्हाण, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ.पराग भालचंद्र, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, आज गुरुगोविंद सिंगजी यांच्या समाधी चरणी मराठवाडा सुजलाम, सुफलाम होऊ दे, येथे शिक्षणाचे प्रमाण वाढू, रोजगार वाढू दे अशी प्रार्थना केली. विद्यापीठांनी सध्या एनआयआरएफ मधील रँकिंग कडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी अवंतिका विद्यापीठ, उज्जैनचे कुलपती तथा आयआयटी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही आता आयुष्यभर शिकण्याच्या नवीन विद्यापीठात, प्रवेश करत आहात. या विद्यापीठात परीक्षा नाहीत, गुण नाहीत, प्रमाणपत्रे नाहीत, व्याख्याने नाहीत आणि प्रयोगशाळाही नाहीत. मात्र या विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी अनुभवातून शिकत असतो. खरे जग हे गतिशील प्रणाली आहे. ते सतत बदलत असते. कोविडनंतर या बदलांचा वेग अधिक वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीत काही कौशल्य कालबाह्य होतात, तर काही नवीन कौशल्यांची निर्मिती होते आणि ह्याच कौशल्यांची मागणी असते. स्वतः नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमता ही आजच्या जगातली खरी आवश्यकता आहे. या संदर्भात मला एकलव्याची कथा फार महत्त्वाची वाटते. त्यांनी धनुर्विद्या स्वतः शिकली आणि आत्मसात केली. गुरुदक्षिणा म्हणून त्याने आपला अंगठा अर्पण केला आणि त्यानंतर आपल्या पायांच्या साहाय्याने धनुर्विद्या अवगत केली. त्यामुळे आजच्या काळात आपल्याला अनेक असे एकलव्य घडवावेत लागतील. अशा व्यक्तीला आपण डिजिटल एकलव्य म्हणू शकतो.
यावेळी दीक्षान्त समारोहाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठाच्या वैशिष्ठेपूर्ण उपक्रमासह विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण बाबींचा अहवाल सादर केला.
याप्रसंगी विद्यापीठातून विविध विषयामध्ये सर्वाधिक गुण घेणारे सयदा तयबा, सागर गोरगिळे, तनिषा चव्हाण, रत्नशील सोनकांबळे, प्रसाद बोडखे, जहीर काझी, नाजिया शेख, वैष्णवी साकोळे, गायत्री चव्हाण, अंजुम बानू, सना गाडीवान, पद्मश्री मुसळे, अवंतिका पवार, अकिब अहेमद, अंजली बिरादार, आरती रोडगे, ऐश्वर्या नादे, हुडा दुरानी, बलजींदरकौर कांचवाले, गोविंद टीथे, कोमल धुमार, मनदीप तुलसाणी, गीता गुणाळे, सरस्वती लंगुटे, जीगिशा देशपांडे, सिंधुताई पाटील, नेहा कुरील, प्रतिभा जाधव, ऐश्वर्या कुलकर्णी, व्यंकट पांचाळ, कल्पना गाजरे, सुषमा पाटील, संयुक्ता कोचुरे, गायत्री सोळंकी, काजल वाघमारे, दीपिका यादव, विजया कांबळे, प्रतिमा मजगे, कैलास आघाव आणि नरसिंग बुगडे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये मान्यवराच्या हस्ते विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. ज्ञानदंडासह दीक्षांत मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यांनतर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. तर राष्ट्रगीताने दीक्षांत समारोहाचे सांगता झाली. यावेळी विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्यासह प्राधिकरण, विविध समीतीचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्यात घरफोडी, अवैध वाळू उपसा, सट्टेबाजी व विविध गुन्ह्यांची नोंद

Next Post

कंधार पोलिसांची मोठी कामगिरी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज नांदेड जिल्ह्याचा दौरा

October 25, 2025
शिक्षण

शरदचंद्र पवार लॉ कॉलेज नांदेड येथे भव्य पदवी वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

October 23, 2025
राजकारण

नांदेड जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप आरक्षण अधिसूचना जाहीर 17  हरकतीव व सूचना सादर करण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

October 14, 2025
राजकारण

नांदेड जिल्ह्यातील एकूण 130 घनाचे आरक्षण निश्चित

October 14, 2025
शिक्षण

शरदचंद्र पवार विधी महाविद्यालय, नांदेड येथे भव्य पदवी वितरण, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

October 13, 2025
राजकारण

जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर

October 10, 2025
Next Post

कंधार पोलिसांची मोठी कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाकडून विविध कर्ज योजना उपलब्ध

October 29, 2025

नांदेडमध्ये 63 लाखांचा अवैध मुद्देमाल स्फोट करून नष्ट

October 29, 2025

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

October 29, 2025

सरदार पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त एकता अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

October 29, 2025

सर्वाधिक वाचलेले

  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अबैधरीत्या गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सार्वजनिक ठिकाणी मध्य पिणाऱ्यास नांदेड पोलीस ची धडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved