नांदेड, दि. 30 सप्टेंबर –(प्रतिनिधी)
नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करून पळून गेलेला आरोपी अटक केला आहे.
भाग्यनगर पोलिस ठाण्यातील खालील गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी शोधला जात होता –
- गु.र.नं. 52/2022 भा.दं.वि. कलम 392, 34
- गु.र.नं. 546/2024 कलम 304 (2), 3(5) BNS
- गु.र.नं. 579/2024 कलम 304 (2), 3(5) BNS
या गुन्ह्यांमध्ये असलेला आरोपी रोहन ऊर्फ पिंके पि अंबादास गायकवाड (वय 24, व्यवसाय मजुरी, रा. विष्णूनगर नांदेड, मूळ रा. अपोलो हॉस्पिटलच्या पाठीमागे, भिमनगर, परभणी)
कारवाईचा तपशील
दि. 30/09/2025 रोजी दुपारी 12.41 वा. गुन्हे शोध पथकाचे पो.उपनिरीक्षक संतोष तांबे महेश माळी पोलीस निरीक्षक भुनेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले उपनिरीक्षक विनोद देशमुख व विशाल भाळवे गजानन किडे आदरदान पठाण विष्णुकांत मुंडे राहुल लाटकर नागनाथ चापके देवसिंग सिंगल सर्व नेमणूक पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड व पथकातील पोलीस स्टेशन भाग्यनगर. यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिमनगर, परभणी येथे आरोपी आढळून आला. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीने आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कसून चौकशीनंतर त्याचे नाव रोहन ऊर्फ पिंके गायकवाड असे स्पष्ट झाले. तो बराच काळ फरार असून त्याचा शोध सुरू होता. अखेर तो भामनगाव पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
पुढील कार्यवाही
अटक केलेला आरोपी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केले आहे.
👉 ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर रमेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.












