नांदेड, दि. २० सप्टेंबर :- रब्बी पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान कडधान्य- गहू, हरभरा, पोष्टिक तृणधान्य- रब्बी ज्वार राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषी विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेतर्गत ज्वार या घटकातर्गत रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, करडई व सुर्यफुल या पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचविणे हे या योजनेचे मुख्य उद्यिष्ट आहे.
पिक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे 31 मार्च 2024 पूर्वी नोदणीकृत शेतकरीगट, महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. ही सुविधा 2 सप्टेंबर 2025 पासून उपलब्ध करुन दिली आहे. संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक औषधे आणि खते या शिर्षकाखाली शेतकरीगटांना अर्ज करता येईल.
तालुक्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पिक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी गावाचे सहय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन अर्धापूर तालुका कृषी अधिकारी सुनील देवकांबळे यांनी केले आहे.












