नांदेड दि. 29 नोव्हेंबर 2025 (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचे सत्र सुरू केले असून सलग दोन दिवसांत सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राइव्ह अंतर्गत विविध ठिकाणी विशेष ऑपरेशन राबवून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मु. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली शहरातील शांतता बिघडविणाऱ्या, नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी ही मोहीम राबवण्यात आली.
कारवाईची ठळक ठळक वैशिष्ट्ये
1) पोलीस स्टेशन भाग्यनगर
सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राइव्हदरम्यान दोन इसमांना पोलीस अंमलदारांनी गंजिया चौकात 01 इसम तर मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक शांततेचा भंग करताना पकडले. संबंधितांवर कलम 110/117 म. पो. कायद्यानुसार गुन्हे दाखल.
हातगाडी दारू दुकान, वाईन शॉप, हॉटेल्स येथे तपासणी.
2) पोलीस स्टेशन इतवारा
इटवारा पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये दोन इसमांना सार्वजनिक शांततेचा भंग करताना पकडले. संबंधितांवर 110/117 म. पो. कायद्यानुसार कारवाई.
परिसरातील दारू दुकानांवर तपासणी.
3) पोलीस स्टेशन शिवाजीनगर
येथील गस्ती पथकाने दोन मद्यधुंद इसमांना ताब्यात घेतले. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई.
हातगाडी दारू दुकान, वाईन शॉप, हॉटेल्स यांच्यावर तपासणी मोहीम.
4) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण
सीडको परिसरातून एक इसम मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालताना आढळून आला. त्याच्यावर 110/117 अन्वये गुन्हा दाखल.
ग्रामीण भागातील दारू दुकानांवरही तपासणी.
5) दामिनी पथकाची कारवाई
विसावा गार्डन, कालनाळा कोपऱ्याजवळ तीन इसम मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. तत्काळ अटक करून 110/117 नुसार कारवाई.
विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी संवेदनशील क्षेत्रांमध्ये कडक नजर.
पोलीस अधीक्षकांचा इशारा सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ केला तर कठोर कारवाई
मु. श्री. अबिनाश कुमार यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत स्पष्ट केले की, शहरातील कुठल्याही ठिकाणी सार्वजनिक शांतता बिघडविणाऱ्यांना पोलिसांकडून कोणतीही सूट दिली जाणार नाही. नागरिकांनी कायदा हातात न देता शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
एकूण कारवाई
- विविध पोलीस ठाण्यांतून 8 पेक्षा अधिक इसमांवर गुन्हे
- वाईन शॉप, हातगाडी दुकाने, हॉटेल्सवर तपासणी
- शहर व ग्रामीण भागात संयुक्त मोहीम
नांदेड पोलिसांच्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी शिस्त व सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.












