नांदेड, दि. 25 नोव्हेंबर 2025 (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मा. श्री अभिनाश कुमार यांनी दिल्यानंतर, सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत विविध पथकांनी 22, 23 व 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान धडक मोहीम राबवली. या मोहिमेत शहरातील अनेक भागांत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या 15 व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110/117 नुसार कारवाई करण्यात आली.
या मोहिमेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा.अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पथकप्रमुख, पोलीस अधिकारी, अंबलदार व पेट्रोलिंग टीम तैनात करण्यात आली होती. शहरातील गर्दीच्या ठिकाणी, चौक, पेट्रोलपंप, बायपास, हॉटेल परिसर येथे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
🔹 1) पोलीस स्टेशन भाग्यनगर
सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्हदरम्यान चालू क्रमांक एक, तीन तसंच अंबलदार टीमने राजमाता जिजाऊ नगर, पूर्णा रोड, वसंतनगर परिसरात तपासणी करताना 05 इसम दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करत असल्याचे दिसून आले. संबंधितांवर कलम 110/117 नुसार गुन्हे नोंदवले गेले. तसेच हॉटेल्स, दारूची दुकाने, वाईन शॉप यांची तपासणी करण्यात आली.
🔹 2) पोलीस स्टेशन विमानतळ
येथील पथक क्रमांक तीनने पेट्रोलिंगच्या वेळी विमानतळ पेट्रोलपंप परिसरात 04 इसमांना दारूच्या नशेत गैरवर्तन करताना आढळले. त्वरित कारवाई करत संबंधितांवर कलम 110/117 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. परिसरातील हॉटेल्स, दारू दुकाने यांचीही पाहणी केली.
🔹 3) पोलीस स्टेशन वजीराबाद
येथील पथकाने बसस्टँड, वजीराबाद रोड परिसरात विशेष मोहीम राबवून 02 इसम आढळले. मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहतूक ठिकाणे, दुकानांचीही तपासणी करण्यात आली.
🔹 4) पोलीस स्टेशन इतवारा
इटवारा पथकाने जुना मोघा परिसरात 01 इसम दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे आढळले. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली. तसेच विविध गल्लीबोळ, बाजारपेठा येथे गुन्हे प्रतिबंधक मोहीम राबवली गेली. या मोहिमेत जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने मिळून 68 संशयितांची तपासणी केली.
🔹 5) पोलीस स्टेशन शिवाजीनगर व ग्रामीण
शहरातील शिवाजीनगर व ग्रामीण भागात 01 इसम सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळला. त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. शिवाय परिसरातील हॉटेल्स, वाईन शॉप, चौक यांची तपासणी करण्यात आली.
🔹 दमिनी पथकाची स्वतंत्र कारवाई
दमिनी पथकातील महिला पथकाने देगलूर नाका, आनंदनगर परिसरात 15 इसमांची तपासणी केली. त्यापैकी अनेकांनी सार्वजनिक शांतता भंग केल्याचे दिसून आल्याने कलम 110/117 अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले.
🔚 पोलिस अधिकाऱ्यांचे आवाहन
पोलीस अधीक्षक कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले की,
- शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये.
- शांतता भंग करणाऱ्यांची त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
- उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
नांदेड पोलीस दलाने सार्वजनिक सुरक्षेसाठी राबविलेली ही मोहीम पुढील काळातही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.












