नांदेड | २७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या तलवारी बाळगून आपसात मारामारी करून कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या आरोपींवर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत तीन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन तलवारी व तीन मोटारसायकल असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस ठाणे भाग्यनगर गुन्हा क्रमांक ६६७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १९४ तसेच शस्त्र अधिनियमाचे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर कारवाई दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली.
आरोपींची नावे व पत्ता :
- रवीर चंद्रकांत बुकतरे (वय २२), व्यवसाय – मजुरी, रा. कल्याण नगर, नांदेड
- रवी किरण गौतम कांबळे (वय २८), व्यवसाय – मजुरी, रा. कल्याण नगर, नांदेड
- शुभम विशाल गायकवाड (वय २८), व्यवसाय – मजुरी, रा. कल्याण नगर, नांदेड
यांच्यासह इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालके ताब्यात घेण्यात आली आहेत.
कारवाईची हकीकत :
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. २७/१२/२०२५ रोजी दुपारी १.३० वाजता, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विरोध देशमुख व त्यांचे पथक ९१ रोडवर पेट्रोलिंग करीत असताना जय भवानी चौक, कल्याण नगर येथे वरील आरोपी सार्वजनिक ठिकाणी दोन तलवारी घेऊन आपसात मारामारी करून शांतता भंग करत असल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ कारवाई करत पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील दोन तलवारी व तीन मोटारसायकल जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २,३०,००० रुपये आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
ही कारवाई मान. श्री. अबिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड), श्रीमती अर्चना पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर), श्री. सुरज गुरु (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड), श्री. रामेश्वर व्यंजने (उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक महेश माळी, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक विरोध देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोलीस कॉन्स्टेबल विशाल माळवे, गजानन किडे, विष्णुकांत मुंडे, देविदास सिंगल, राहुल लाटकर, नागनाथ चापके, अंकुश कांबळे आदींनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.
सदर उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.












