नांदेड, दि. 05 ऑक्टोबर 2025
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात आणि नो पार्किंग क्षेत्रात उभ्या वाहनांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली, पोलिस अप्पर उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या देखरेखीखाली सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकाने ही मोहीम राबवली.
दिनांक 04 ऑक्टोबर 2025 रोजी शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर तसेच नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
१) पोलिस स्टेशन भाग्यनगर
सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने भाग्यनगर क्षेत्रात छत्रपती चौक, येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली 110/117 म.पो. कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल, दारूची दुकाने, वाईन शॉप आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
२) पोलिस स्टेशन वजिराबाद
वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बस स्थानक या ठिकाणी कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करताना चार इसम आढळलेल्या लोकावर कलम 110/117 म.पो. कायदा नुसार कारवाई करण्यात आली. तसेच दारूचे दुकाने, हॉटेल्स आणि वाईन शॉप ची तपासणी करण्यात आली.
३) पोलिस स्टेशन इतवारा
इटवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव रोड परिसरात पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेत २ आरोपींवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल कलम 110/117 म.पो. कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील दुकाने, हॉटेल्स आणि वाईन शॉप्सची तपासणी करण्यात आली.
४) पोलिस स्टेशन शिवाजीनगर :
सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने शिवाजीनगर परिसरातील ए.टी.आय. जवळील गोवर्धन हॉटेलसमोर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १६ मोटारसायकलींवर दंडात्मक कारवाई करत ₹१६,००० इतका दंड आकारला.
५) पोलिस स्टेशन विमानतळ :
या क्षेत्रातील पोलिसांनी मातोश्री रोडवर एक बुलेट विना नंबर मोटारसायकल जप्त करून ₹२,००० इतका दंड आकारला. तसेच दारू दुकाने, हॉटेल्स आणि वाईन शॉप्सची तपासणी करण्यात आली.
६) दामिनी पथक :
दत्तनगर पोलिस पथकाने अमरनगर आणि पेट्रोलिंग दरम्यान रिक्षा परिसरात ५ आरोपींवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल कलम 110/117 म.पो. कायदा अंतर्गत कारवाई केली.
तसेच नांदेड विमानतळ व शिवाजी नगर येथेही पोलिसांनी तपासणी मोहीम राबवली.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की,
“शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गोंधळ घालणे किंवा नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे यास पोलिसांकडून अजिबात सहन केले जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी पोलिसांचे सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक अशा मोहिमा नियमितपणे राबवत राहील.”












