देगलूर, दि. 26 सप्टेंबर :
देगलूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मोठी कारवाई करत अवैधरीत्या वाहतूक होत असलेला 95 गांजाचे झाडे केले जप्त या गांजाची बाजारभावातील किंमत तब्बल ₹2,83,000/- इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनाक्रम
दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायं. 4.35 वाजता देगलूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे देगलूर श्री अश्रूदेव दिलीपराव पवार पोलीस निरीक्षक देगलूर श्री महाजन राजेश्वर महेशवाड पोलीस स्टेशन देगलूर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, करडखेडवाडी शिवारात संशयित व्यक्ती गांजाची वाहतूक करत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तपास सुरू केला. रात्री 11.36 वाजता पोलिसांनी करडखेडा शिवारात कारवाई करून आरोपी बालाजी रुखमाजी कोंकेवार (रा. करखेडवाडी ता. देगलूर) याला ताब्यात घेतले.
जप्त मालमत्ता
- अवैध 95 गांजाचे झाडे
- बाजारभाव : ₹2,83,000/-
पोलिसांची टीम
या कारवाईत पोलीस अधीक्षक मा श्री अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी मा श्री अर्चना पाटील मा श्री संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर सा पो उप नि उत्तम सकनुरे, मोहन कुलकवळे ज्ञानोबा केंद्रे चंद्रकांत भाग्यवंत साहेबराव सगरोळीकर रिहाना शेख वैजनाथ मोटरगे नामदेव मोरे बळीराम घुळे नामदेव शिरोळे ज्ञानेश्वर ठाकूर विष्णू यमलवाड संतोष बोकलवार मंजुषा लघुळे,यांनी गुन्हे शोध पथकातील जवानांनी संयुक्तपणे सहभाग घेतला.
पुढील कार्यवाही
आरोपीविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भारत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वेळेत व अचूक पद्धतीने केलेल्या या कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
👉 या कारवाईमुळे अवैध गांजा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












