नांदेड, दि. 14 ऑक्टोबर 2025 :
जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ, कंधार संचालित शरदचंद्र पवार लॉ कॉलेज, नांदेड येथे आज (14 ऑक्टोबर) रोजी “इंडक्शन प्रोग्राम, पदवी वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनील जी. वेदपाठक (प्रधान जिल्हा न्यायाधीश, नांदेड) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अतिथी द’ऑनर म्हणून मान. श्री एस. डी. इंदलकर (सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन, नांदेड) आणि डॉ. श्री दिगंबर नेटके (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, स्व. रा. त. म. विद्यापीठ, नांदेड) यांनी उपस्थिती लावली.
तर विशेष अतिथी म्हणून मान. श्री शरद देशपांडे (सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन व सचिव, DLSA नांदेड) आणि ॲड. श्री आशिष गोधमगावंकर (अध्यक्ष, नांदेड बार असोसिएशन) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनील बालाजीराव धोंडेघे, सचिव – जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ, कंधार होते.
कॉलेजच्या प्राचार्य डॉ. एम. बी. अली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. अमर सांगू (NAAC समन्वयक व उपप्राचार्य), मिस गफ्फार लुबना फरीण (IQAC समन्वयक), आणि डॉ. जोशी शर्वरी (सह-समन्वयक, NAAC) अँड साहेबराव चव्हाण यांनी कार्यभार सांभाळला.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत इंडक्शन प्रोग्रामद्वारे करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेतील संधी, नैतिकता व सामाजिक जबाबदारीचे भान याबाबत मौल्यवान विचार ऐकायला मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबकपणे पार पडले असून शेवटी प्रा. डॉ. ज्योती सुनील धोंडे यांनी आभार मानले.
स्थळ: शरदचंद्र पवार लॉ कॉलेज, नांदेड
वेळ: सकाळी 10.00 वाजता
🌟 या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास व विधी शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला.











