नांदेड (प्रतिनिधी) – जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ, कंधार यांच्या अधिपत्याखालील शरदचंद्र पवार विधी महाविद्यालय, नांदेड येथे मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता भव्य “नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा, पदवी वितरण समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मा. श्री सुनील जी. वेदपाठक (प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नांदेड) हे उपस्थित राहणार आहेत.
गेस्ट ऑफ ऑनर म्हणून मा. श्री एस. डी. इंदळकर (वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश, नांदेड) व डॉ. श्री दिगंबर नेटके (विशेष कार्य अधिकारी, स्वा.रा.तु.मु. नांदेड) हे उपस्थित राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून मा. श्री शरद देशपांडे (वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड) तसेच एडवोकेट. श्री आशिष गोधमगावंकर (अध्यक्ष, नांदेड बार असोसिएशन) उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुनील बालाजी धोंडगे, सचिव – जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ, कंधार, हे भूषवणार आहेत.
आमंत्रित मान्यवरांमध्ये
- डॉ. ज्योती सुनील धोंडगे (सचिव, सावित्रीबाई फुले महिला विकास प्रतिष्ठान, कंधार),
- डॉ. एम. बी. अली (प्राचार्य, शरदचंद्र पवार विधी महाविद्यालय, नांदेड),
- डॉ. अमर सांगू (उपप्राचार्य व NAAC समन्वयक),
- मिस. गफ्फार लुबना फरहीन (सहाय्यक प्राध्यापक व IQAC समन्वयक),
- डॉ. जोशी शर्वरी (सहसमन्वयक, NAAC) यांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम शरदचंद्र पवार विधी महाविद्यालय, नांदेड येथे पार पडणार असून, विविध क्षेत्रातील न्याय, शिक्षण व सामाजिक कार्यातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त करून देणार आहे.
कार्यक्रमात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत, पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी वितरण आणि महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शैक्षणिक व प्रेरणादायी ठरणार असून सर्व विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि पालक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











