नांदेड – दिनांक ११ सप्टेंबर २०२५
सोनखेड पोलिसांनी चोख गुप्त तपास करून पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश करत एकूण रु. १,३७,५००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
क्र. पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 1 सोनखेड 163/2024 कलम 305(अ), 334 (अ) भा.दं.वि. 2 सोनखेड 76/2025 कलम 303(2), 3(5) भा.दं.वि. 3 सोनखेड 81/2025 कलम 305(अ), 334 (अ) भा.दं.वि. 4 सोनखेड 179/2025 कलम 305(अ), 334 (अ) भा.दं.वि. 5 नांदेड ग्रामीण 696/2025 कलम 305(अ) भा.दं.वि.
आरोपींची नावे व पत्ते
- सुदाम कोंडाजी घोडके – वय ३४ वर्षे, रा. भाई गल्ली ता. लोहा जि. नांदेड
- युनूस नजीर कुरेशी – वय ३३ वर्षे, रा. भाई गल्ली ता. लोहा जि. नांदेड
जप्त मुद्देमाल
- रोख रक्कम: ₹ ६७,५००/-
- सोन्याचे दागिने: अंदाजे ₹ ७०,०००/-
एकूण किंमत: ₹ १,३७,५००/-
पोलिसांची कारवाई व तपास
या गुन्ह्यांचा तपास श्री. पांडुरंग माने, सहा. पोलिस निरीक्षक, सोनखेड यांनी दक्षतेने करून आरोपींची नावे समोर आणली. त्यांच्यासह पोलिस पथकातील कर्मचारी गणेश निघोत, रवींद्र बेंडके, कैलास काळे, पंडित पाटील, पोरे सोनखेड, संजय घोरबांडे, संतोष नामगिरी, त्रिविक्रम बेंडके, विशाल देशमुख यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेला रोख रक्कम व सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
वरिष्ठ पोलिसांचे मार्गदर्शन
ही कारवाई मा. श्री. आबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. प्रशांत सिंग, पोलिस उप-अधीक्षक, उदगीर विभाग यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
नागरिकांना आवाहन
नांदेड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गावातील किंवा परिसरातील संशयास्पद व्यक्ती, हालचाली किंवा घटना याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे वेळेत रोखता येतील.












