नांदेड दि. ६ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे नायगाव पोलिसांनी ऑपरेशन फ्लॅशआऊट अंतर्गत अवैध जुगार व्यवसायावरील मोठी धडक कारवाई केली असून रातोळी शिवारातील एका शेतशेडवर टाकलेल्या छाप्यातून तब्बल ₹16,62,150/- किमतीचा रोख व साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई माननीय श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड,
माननीय श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक भोकर,
माननीय श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
त्याअन्वये श्री श्याम पनेगावकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली यांनी पथक तयार करून कारवाई केली.
पथकात — पो.उ.नि. लोखंडे, ताटेवाड, सुदाम जाकोरे, भगवान कोत्तापल्ले, मुद्देवार, पल्लेवाड, इंगळे, निम्मलवाड, अनिल रिंदकवाले, ममताबादे आदी अधिकारी व अमलदार सहभागी होते.
काय घडले?
दिनांक ६/११/२०२५ रोजी मध्यरात्री ३.४५ वाजता मौजे रातोळी शिवारातील विजय चंद्रकांत पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती “अंदर – बाहर” नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
यावरून छापा टाकण्यात आला.
तेथे नगदी, ४ चाकी वाहने, मोटरसायकल, २६ मोबाईल व जुगाराचे साहित्य मिळून
एकूण मुद्देमाल – ₹16,62,150/- असा पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “आरोपी” म्हणून तपासात समोर आलेली नावे
- गजानन चंद्रकांत मोरे – गायकवाड गल्ली, मुखेड
- आकाश व्यंकटराव दरेगावे – दीपक नगर, मुखेड
- शिवाजी बाबुराव पाटील – फुलेनगर, मुखेड
- चंद्रकांत विशंभर पाटोदे – बेरळी, ता. मुखेड
- व्यंकट गंगाराम देवकर – शहाजीनगर, देगलूर
- व्यंकटी पांडुरंग शिंदे – मांजरम, ता. नायगाव
- मोहन शेषराव जाधव – मोकासदरा, ता. नायगाव
- सायलू रामलू नागशेठवार – दत्तनगर, देगलूर
- धर्मेंद्र गंगाधर धरमवार – नाही गल्ली, देगलूर
- धम्मपाल यादवराव कांबळे – सिद्धार्थनगर, देगलूर
- गणेश राजू बच्चेवार – पेडपल्ली, ता. देगलूर
- सिद्धेश्वर माधवराव भोसले – व्यंकटेश नगर, मुखेड
- आशुतोष सूर्यकांत पत्तेवार – नाथनगर, देगलूर
- शेख सिद्दिकी शेख मेनुदिन – अशोक नगर, मुखेड
- देविदास प्रभू लावार – गोकुळ नगर, देगलूर
- सुरेश किशनराव धोंडेकर – फुलेनगर, देगलूर
- संगमेश्वर उर्फ बजरंग कल्याणी – मनोहर टाकीज, मुखेड
- प्रताप दशरथ रघुवंशी – सिडको, नांदेड
- महेश नागनाथ नागमवार – देगलूर
- योगेश रामदास राहुलवार – शांतीनगर, देगलूर
- आदित्य अशोकराव देवडे – वाहेगाव रोड, देगलूर
- बालाजी मल्हारी कोणकेवाड – आनंदनगर, देगलूर
- समीर खजूर शेख – तंबेला गल्ली, मुखेड
- गंगाधर अमृत घायाळे – गायकवाड गल्ली, मुखेड
- गजानन श्रीनिवास इंदुरकर – बडागल्ली, देगलूर
- गंगाराम शिवंता कादंबवार – शिवाबानगर, देगलूर
- राजू उत्तम पवळे – सिडको, नांदेड
- अमजद ताहेर खान पठाण – मोमीन गल्ली, मुखेड
- (इतर तपासादरम्यान समोर आलेले आरोपीही समाविष्ट)
पुढील कारवाई
सदर प्रकरणी नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.












