कंधार पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही तासांत घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करून ३०,००० रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसां विषयी जनतेत विश्वास अधिक दृढ झाला आहे.
घटना अशी घडली:
दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता फिर्यादी यांच्याकडून घरफोडी झाल्याची तक्रार कंधार पोलिसांकडे दाखल झाली होती. फिर्यादी पांडुरंग भुजंगराव मोरे (वय ५२ वर्षे, रा पानशोडी ता.कंधार जि. नांदेड) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने शिरून रोकड ३०,००० रुपये लंपास केले होते.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव पोलीस निरीक्षक श्री. प्रभाकर कवाळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासासह गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.
अटक झालेला आरोपी:
संभाजी नारायण मोरे (वय ३५ वर्षे, व्यवसाय शेतकरी, रा. पानशोडी ता. कंधार जि. नांदेड) याला पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून गुन्ह्यातील ३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईमागील मार्गदर्शन:
या यशस्वी कारवाईसाठी मा. श्री. अबीनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड), मा. श्री. सूरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड) व मा. श्री. संकेत गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी, कंधार उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही मोहीम राबवली.
पोलीस अधीक्षकांचे कौतुक:
या प्रकरणी तत्पर व प्रभावी कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. अबीनाश कुमार यांनी केंद्रा पोलिस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
👉 या कारवाईमुळे पुन्हा एकदा नांदेड पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये भीती आणि कायद्याचा धाक निर्माण केला आहे.












