नांदेड : वजिराबाद पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई करत १० अवैध जनावरांची सुटका केली असून जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १२ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे २.०५ वाजता हदगाव रोड, हस्सनापूर फाटा, नांदेड येथे करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख शोएब शेख रफिक (वय २३), शेख आबिद शेख इरफान (वय ३१), शेख अब्रार शेख रफिक (वय ३१), शेख सलमान शेख मोहम्मद कुर्बान (वय ३७) व रियाज शेख हनीफ (रा. नांदेड) यांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. आबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (गुन्हे) श्री. सुजय गुंड व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रमेशवर गोहणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे. पोलिस अधीक्षकांनी या पथकाचे कौतुक करून पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहतील, असे सांगितले.












